अंजुमन- ए - इस्लाम संस्थेच्या एन. बी ए . मानांकन प्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक , पनवेल येथे नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

अंजुमन- ए - इस्लाम संस्थेच्या एन. बी ए . मानांकन प्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक , पनवेल येथे नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शनास्तव प्रसिद्ध समुपदेशक  कल्पना आचार्य यांचे  महिला सशक्तीकरण म या विषयावर व्याख्यानाचे  आयोजन करण्यात आले. महिला आरोग्य, शिक्षण , आर्थिक स्वावलंबन आदी  पैलूंचा मागोवा घेत विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंदांशी संवाद साधला.संस्थेचे एक्झिकेटिव्ह चेअरमन  बुरहाण हारीस , काळसेकर टेक्निकल कॅम्पस चे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटगी , काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. रमजान खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला तक्रारनिवारण कक्षाच्या प्रमुख प्रा. शाईस्ता खान व त्यांच्या चमूने मेहनत घेतली.