जेएनपीटी
न्हावा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यात येणार्या दास्तान फाटा ते न्हावा येथील ओएनजीसी ची पाईपलाईन तुटल्यामुळे 14 दिवस न्हावा व गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना करण्यात येणारा पाणी पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे रहिवाशांना पाणी समस्यांचा सामना करावा लागत असे.
यांचे गांभीर्य ओळखून न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी ग्रामपंचायत फंडातून न्हावे गावात व न्हावे खाडीच्या तिन्ही पाड्यात गव्हाण फाटा येथून दर रोज 15 ते 16 टॅक्करने पाणी पुरवठा सुरू केला आहे.तसेच न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांवर ओढवणार्या पाण्याच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सिडको चे अधिक्षक अभियंता श्री काळे साहेब(पाणी पुरवठा विभाग) यांच्या सोबत सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी बैठक घेतली. आणि आपल्या नेतृत्वाखाली न्हावे गावातील सर्व पक्षीय शिष्टमंडळ यांच्या माध्यमातून न्हावे व गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गावांना ओएनजीसी कंपनीकडून केल्या जात असलेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सदर पाईप लाईन ची दुरूस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी केली.
7 दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन ओएनजीसी व सिडको या दोन्ही प्रशासनाकडून देण्यात आले. सदर बैठकीस सर्व पक्षीय शिष्टमंडळात उप सरपंच किसन पाटील, माजी सरपंच हनुमान भोईर, शाखाप्रमुख हरेश्वर म्हात्रे, सदस्य सागरशेठ ठाकूर, हरिश्चंद्र म्हात्रे ग्रामसेवक एन,आर, शेंडगे व ग्राम सुधारक मंडळ अध्यक्ष आशिष पाटील हे मान्यवर उपस्थित होते. त्याच प्रमाणे सदर पाईपलाईन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ओएनजीसी चे जीएम सुनील तिवारी साहेब व जीएम श्री कपाले यांनी ओएनजीसी फंडातून 84 लाख देण्यात येणार असल्याचे नमूद केले. व नव्या पाईप लाईनच्या कामासाठी यापुढे 4 ते 5 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे आश्वासन ओएनजीसी कंपनीच्या वतीने दिले.