कर्जत- नेरळ मार्गावरील नवीन पुलांचे बांधकाम निकृष्ट



 








कर्जत-कल्याण या राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत- नेरळ या  भागात 23 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रीड तत्वावर सुरु केले आहे. त्या रस्त्याच्या कर्जत नेरळ भागात दोन नवीन पुलांची निर्मिती करण्यात येत असून त्या पुलांचे सध्या सुरु असलेले बांधकाम लक्षात घेता ते दोन्ही पूल पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे कधीही कोसळू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान,जुने पूल तोडून तेथे नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलावरून वाहतूक सुरु झाल्यास भविष्यत कदाचित तकलादू कामांमुळे पूल कधीही कोसळू शकतात,अशाप्रकारे लोखंड त्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी वापरले जात आहे. नेरळ मधील स्थानिक अभियंत्यांनी त्या कामाबद्दल शंका उपस्थित केली असून कामे अशाप्रकारे झाल्यास पुलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे. 


कर्जत- कल्याण राज्यमार्गावर नेरळ हद्दीत दोन पुलांचे नव्याने बांधकाम केले करण्यात येत आहे. त्यातील नेरळ पोलीस ठाणे येथील पुलाच्या चार पिलर पैकी तीन पिलर चे काम पूर्ण झाले असून एका पिलर चे काम सुरु आहे. मात्र त्या पुलाचे पिलर बांधण्यासाठी करण्यात आलेले पिलर मध्ये जमिनीपासून वर पर्यंत एकाच प्रकारचे लोखंड वापरण्यात आले आहे. त्या लोखंडाच्या सळया या सहा ते आठ एमएम या व्यासाच्या आहेत. त्या लोखंडी सळया साधा माणूस सध्या हाताने सहज वाकवू शकतो. त्यामुळे त्या रस्त्याने असलेली अवजड वाहतूक लक्षात घेता पुलाच्या खाली असलेला पाया मजबूत करण्यासाठी केवळ सहा एमएम व्यासाच्या सळया हि बाब स्थानिकांना खाटणारी आहे. कारण सहा एमएम व्यासाच्या साळयांवर हा पूल उभा राहणार असेल तर भविष्यत काही वर्षात पूल निकामी होऊ शकतो आणि मग नंतर त्या भागातील चार पदरी रस्त्यावरील वाहतुकीचे काय?हा प्रश्‍न नेरळ गावातील अभियंत्यांनी उपस्थित केला आहे. या अभियंतांत्यांनी त्या पुलाच्या सुरु असलेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील केले असून पुलाचे काम हे तकलादू असल्याचा नितीन इंजिनिअरिंग चा दावा आहे. त्याचवेळी मोडक असोसिएटस या इंजिनिअरिंग कंपनीने देखील कामाबद्दल शंका उपस्थित केली आहे. 


 पुलाचे काम उन्हाळ्यात म्हणजे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे काम वेगाने सुरु आहे,पण पिलर साठी वापरलेले लोखंडी किती एमएम चे आहेत हे तपासून घेतले जाईल.